बाळासह महिला कारमध्ये बसलेली असतानाच वाहतूक पोलिसांनी कार टोईंग केल्याचा प्रकार मुंबईतल्या मालाडमध्ये घडला आहे. या प्रकरणात आता मुंबई पोलीस सहआयुक्तांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही महिला नेमकी कोण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. या महिलेचे नाव  समजलेले नाही. कारण याच महिलेच्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ लाइव्ह करण्यात आला.  ही महिला तिच्या बाळाला मागच्या सीटवर बसून दूध पाजत असतानाच वाहतूक पोलीस तिथे आले आणि त्यांनी कार टोईंग व्हॅनने सोबत नेण्यास सुरूवात केली.

या संदर्भातला एक व्हिडिओ या महिलेच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे समजते आहे. कार चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याने टोईंगची कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक तरूणाचा आवाजही येतो आहे. अंकुश राणे असे पोलीस अधिकाऱ्याचे नाव असल्याचे या व्हिडिओतला तरूण ओरडत असल्याने समजते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ चित्रित करणाऱ्या माणसाचा आवाज या व्हिडिओत स्पष्ट ऐकू येतो आहे. व्हिडिओत बोलणारा माणूस कोण आहे? हेदेखील समजू शकलेले नाही. हा माणूस वारंवार पोलिसांना सांगतो आहे की मागे कारमध्ये महिला बाळासह बसली आहे. ती तिच्या बाळाला दूध पाजते आहे मात्र पोलीस त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नाहीत. आता हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ