मुंबई : सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून कोकणालाही पावसाने अक्षरशः झोडपले आहे. अतिवृष्टीमुळे शुक्रवार, २६ जुलै रोजी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालयांची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या हाती, ८३१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणार या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आज शुक्रवार, २६ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.