scorecardresearch

मुंबई विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित

मुंबई : अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेसंदर्भातील कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारपासून (३ फेब्रुवारी) होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थगित केलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल. असे विद्यापीठाने जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन […]

mumbai university exams postponed
मुंबई विद्यापीठ (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेसंदर्भातील कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारपासून (३ फेब्रुवारी) होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थगित केलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल. असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीकडून गुरुवारी २ फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरूवारी दुपारी १२ च्या कामकाजावर बहिष्कार टाकला, त्यापूर्वी सकाळी ८ ते ९ दरम्यान परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचल्यामुळे बुधवारी परीक्षेवर फारसा परिणाम झाला नाही.

विविध विभागांच्या दहा परीक्षा सुरळीत झाल्या. परंतु कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शुक्रवारपासून होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. परिणामी परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवारपासून मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 00:49 IST