‘आयडॉल’चे प्रवेश आजपासून

१७ अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दूरशिक्षण कक्षाने (यूजीसी-डीईबी) नुकतीच मान्यता दिली.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) १७ अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दूरशिक्षण कक्षाने (यूजीसी-डीईबी) नुकतीच मान्यता दिली. त्यानुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांचे प्रवेश बुधवारपासून (२७ ऑक्टोबर) सुरू होणार आहेत.

पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदूी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी आयटी या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होत असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर आहे. 

हे प्रवेश ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विभागीय उपकेंद्रांवर मार्गदर्शन

आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण व रत्नागिरी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. लवकरच सावंतवाडी व पालघर येथेही विभागीय केंद्रे सुरू होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षांपासून गुणपत्रिकादेखील उपकेंद्रांवर मिळतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai university idol admission 2021 from today zws

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या