मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया आजपासून

शैक्षणिक वर्षासाठी (२०२१-२२) विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत असून नोंदणी करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रणालीवर प्रवेशपूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे. या शैक्षणिक वर्षासाठी (२०२१-२२) विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.

अर्ज कसा करायचा?

विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac संकेतस्थळावर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करावे click on-Mumbai University Pre Admission online Registration २०२१-२२) विद्याथ्र्याने स्वत:बद्दलची माहिती भरून नोंदणी करायची आहे. त्यानंतर मोबाइल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्यानंतर आवश्यक माहिती भरून विद्यार्थ्यांनी छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. त्यानंतर शिक्षणक्रम आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना निवडता येतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai university pre admission registration process from today akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या