डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाचे प्रकरण खूपच चिघळले असून आता थेट राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी डॉ. वेळूकर यांना विद्यापीठाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा, अशी सूचना केली.
डॉ. हातेकर यांचे निलंबनानंतर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन तसेच विविध राजकीय पक्षांनी केलेला हस्तक्षेप लक्षात घेऊन राज्यपालांनी डॉ. वेळूकर यांना बोलावणे पाठविले होते.  गुरुवारी संध्याकाळी राज्यपाल आणि कुलगुरू यांची भेट झाली. याभेटीत हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा आणि यासाठी योग्य ती कार्यपद्धती पाळावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रकरणाची दखल घेत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही या प्रकरणाचा अहवाल पोहोचल्याचे समजते.

विद्यार्थ्यांचे उपोषण
हातेकर यांच्या निलंबनाच्या विरोधात आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी २० जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. डॉ. हातेकर यांचे समर्थन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रित येऊन ‘विद्यार्थी संयुक्त कृती आघाडी’ची स्थापना केली असून पहिली जाहीर सभा १८ जानेवारीला दुपारी ४ वाजता विद्यापीठाच्या कालिना संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ होणार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Story img Loader