मुंबई : मुंबई विद्यापीठाने द्वितीय सत्रांतर्गत (हिवाळी सत्र २०२४) घेतल्या जाणाऱ्या चारही विद्याशाखाअंतर्गतच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच अभियांत्रिकी, वास्तुकला, फार्मसी आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक हे मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
‘मुंबई विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे अर्ज दाखल करण्याचा कालावधी आणि परीक्षा शुल्क विनाविलंब भरण्याचा कालावधीही जाहीर करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी दिलेल्या कालावधीतच परीक्षा अर्ज आणि शुल्क भरावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
हिवाळी सत्र २०२४ परीक्षा कधी सुरू होणार?
तारीख – अभ्यासक्रम
२३ ऑक्टोबर – वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बी.कॉम., बी.कॉम. फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकाउंटिंग ॲण्ड फायनान्स आणि बी.एम.एस. सत्र ५
१३ नोव्हेंबर – तृतीय वर्ष बी.ए. सत्र ५, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बी.एस्सी., बी.एस्सी. संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, फॉरेन्सिक आणि डेटा सायन्स या अभ्यासक्रमांचे सत्र ५
१९ नोव्हेंबर – विधि शाखा (तीन वर्षीय अभ्यासक्रम) सत्र ५ आणि विधि शाखा (पाच वर्षीय अभ्यासक्रम) सत्र ९
© The Indian Express (P) Ltd