scorecardresearch

मुंबई विद्यापीठाचा ८०९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

करोनामुळे बदललेली शिक्षणपद्धती आणि नवे शैक्षणिक धोरण समोर ठेवून मुंबई विद्यापीठाने डिजिटलायजेशन आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर दिला आहे. 

मुंबई : करोनामुळे बदललेली शिक्षणपद्धती आणि नवे शैक्षणिक धोरण समोर ठेवून मुंबई विद्यापीठाने डिजिटलायजेशन आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर दिला आहे.  विविध नावीण्यपूर्ण योजना आणि विकासकामांना प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा  २०२२ – २३ या वर्षांचा ८०९ कोटी रुपये तरतुदीचा आणि ७३ कोटी ८८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प बुधवारी अधिसभेत मंजूर करण्यात आला.

गतवर्षीच्या तुलनेने यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये वाढ झाली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेत वित्त व लेखा अधिकारी डॉ. (सीए) प्रदीप कामथेकर यांनी अर्थसंकल्प सादर केला.  डिजिटल युनिव्हर्सिटीसाठी या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह ग्रॅफिटायझेशन मशीन फॉर मुंबई युनिव्हर्सिटी एक्सलेटर सेंटर, डिजिटल ग्रंथालय, सेंटर फॉर एक्सलेंस इन थॅरोटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्स याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

 क्रीडा संकुलाची स्थापना, नवीन ग्रंथालय, फर्निचर व उपकरणे, मुंबई विद्यापीठ माजी विद्यार्थी संघाची स्थापना, विद्यापीठ परिसराचे सुशोभीकरण, विद्यापीठ परिसर विकास,  मुंबई म्युन्स्टर इंस्टिटय़ूट ऑफ एडव्हान्स स्टडीज, अकॅडेमिक ऑडिट पोर्टल फॅसिलिटी टू स्टेट युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र स्टेट, मराठी युनिकोड सॉफ्टवेअर अँड ट्रेनिंग, पाणिनी  चेअर, स्वामी विवेकानंद चेअर या नावीण्यपूर्ण उपक्रमासोबतच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, सामाजिक व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य यासाठी भरीव तरतूद  करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai universitys budget approved corona development infrastructure ysh

ताज्या बातम्या