scorecardresearch

अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने मुंबईत खळबळ; चेहऱ्यावर जखमा!

बांगुर नगर परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

dead
सांकेतिक फोटो

मुंबईमधील पश्चिम गोरेगाव भागातील बांगुर नगर परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (२७ जानेवारी) सकाळी हा मृतदेह आढळल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>Ashish Shelar Death Threat : आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी! वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या चेहऱ्यावर जखमा झालेल्या आहेत. याच कारणामुळे या महिलेची ओळख पटवण्यास अडचणी येत आहेत. पोलिसांना या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शांताबाई रुग्णालयात पाठवलेला असून तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

हेही वाचा >> “मी कुठे म्हणतो माझा सल्ला ऐका,” प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले “महाविकास आघाडीला…”

महिलेच्या मृत्यूच्या कारणाचे पोलीस शोध घेत आहेत. या महिलेचा मृत्यू अपघातामुळे झाला की इमारतीवरून पडल्यामुळे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 22:44 IST
ताज्या बातम्या