मुंबईकरांनो, आज लसीकरण बंद… कधीपासून होणार सुरू?; महापालिकेनं दिली माहिती

मुंबईत महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केलं जाणार नसल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

mumbai vaccination latest update, vaccination drive suspended, bmc tweet
महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केलं जाणार नसल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर जोर दिला जात आहे. मुंबईत वेगानं लसीकरण सुरू असल्याचं दिसत असून, लसटंचाईमुळे लसीकरणात खोळंबाही निर्माण होताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईत बुधवारी लसीकरण बंद असणार आहे. महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केलं जाणार नसल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

लसीकरण कार्यक्रमाच्या सुरूवातीला केंद्राने विशिष्ट वयोगटातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. यामुळे राज्ये आणि महानगरांमध्ये लस खरेदीसाठी स्पर्धा सुरू झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर केंद्रानं १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, लसटंचाईचा प्रश्न कायम आहे.

दरम्यान, मुंबईत लसीकरणाला खो बसला आहे. मुंबईत आज (४ ऑगस्ट) लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेनं याची माहिती दिली आहे. “मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (४ ऑगस्ट २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू”, असं महापालिकेनं म्हटलं आहे.

महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण केलं जाणार नसलं, तरी खासगी रुग्णालयातील लसीकरणाबद्दल महापालिकेनं कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात नागरिकांचं लसीकरण सुरूच असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai vaccination latest update vaccination drive suspended bmc tweet bmh

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या