मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग २०८ मधून ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाचे उमेदवार रमाकांत रहाटे यांचा दणदणीत विजय झाला.

रमाकांत रहाटे यांना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ११,६५३ मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे विजय लिपारे यांना ७,४६५ मते मिळाली. इंडियन नॅशनल काँग्रेसचे सतीश खांडगे ४,३३५ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगेश बनसोड यांना १००९ मध्ये तर अपक्ष अरुणा जैतपाळ यांना ११५ मते मिळाली. नोटाला ४०० मते मिळाली.

शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे रमाकांत रहाटे रमाकांत यांनी एकूण ११,६५३ मते मिळवून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे विजय (दाऊ) लिपारे यांचा पराभव केला. लिपारे यांना ७,४६५ मते मिळाली, म्हणजेच रहाटे यांनी सुमारे ४,१८८ मतांच्या फरकाने दणदणीत विजय नोंदवला आहे. २४,९७७ एकूण वैध मते ठरली. विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवक रहाटे यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.