मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ १२.१२ टक्के जलसाठा उपलब्ध असून राज्य सरकारने राखीव साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, असे असले तरी पाऊस एक आठवड्याने लांबल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, जलसाठ्याची स्थिती केवळ पावसावरच अवलंबून असल्याने तूर्तास ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सात धरणांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाल्यास मुंबईकरांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होते. मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा खालावल्यामुळे आणि पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी महानगरपालिकेने १५ मेपासून मुंबईमध्ये १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार ११ जून रोजी सकाळी ६ वाजता सातही धरणांमध्ये एकूण १२.१२ टक्के म्हणजे एक लाख ७५ हजार ४६५ दशलक्ष लिटर इतका साठा उपलब्ध होता. उर्ध्व वैतरणा धरणातील वापरायोग्य पाण्याचा साठा शून्यवर आला आहे. तानसामध्ये अवघा ७.१५ टक्के वापरायोग्य पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर विहारमध्ये ४३.३६ टक्के, मोडकसागरमध्ये ३२.४४ टक्के, तुळशीमध्ये २४.६६ टक्के, मध्य वैतरणामध्ये १४.४८ टक्के, तर भातसामध्ये ११.३३ टक्के वापरायोग्य पाण्याचा साठा उपलब्ध आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मुंबईकरांसाठी उर्ध्व वैतरणा धरणा आणि भातसा धरणातील राखीव पाणीसाठा वापरण्यास महानगरपालिकेला परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबईकरांना १९ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल. दरम्यानच्या काळात पाऊस पडल्यानंतर धरणांतील जलसाठ्यात वाढ होईल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्यासंदर्भात परिस्थितीनुरुप निर्णय घेण्यात येईल. – अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त

उपलब्ध वापरायोग्य

पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) धरणाचे नाव

पाणीसाठा

टक्केवारी उर्ध्व वैतरणा

० मोडकसागर

४१,८२८

३२.४४ % तानसा

१०,२६८

७.१५

% मध्य वैतरणा

२८,०२२

१४.४८ % भातसा

८१,२५२

११.५५ % विहार

१२,०११

४३.३६ % तुळशी

१,९८४

२४.६६ %

मागील तीन वर्षांतील ११ जून पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

२०२६ – १ लाख ७५ हजार ४६५ २०२५ – १ लाख ४१ हजार ८६७ २०२४ – ८२ हजार ६२३