मुंबई : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोरील १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे बुधवारी रात्री उशिरा आढळून आले. महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून दुरुस्तीच्या कामाचे स्वरूप मोठे आहे. त्यामुळे पालिकेच्या ‘डी’, ‘ई’ आणि ‘जी/दक्षिण’ प्रभागांतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारा परिसर
१) डी विभाग : लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे. बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, ग्रँट रोड (पूर्व), बलराम स्ट्रीट, डॉ. डी. बी. मार्ग, पाथे बापूराव मार्ग तसेच संपूर्ण मुंबई सेंट्रल परिसर.( बुधवार, ७ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील)
ठाकूरद्वार, एम. के. रोड, आर. आर. रोड, जे. एस. एस. रोड, खाडिलकर रोड (पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येईल)
गिरगाव रोड, ह्यूजेस रोड, बाबुलनाथ रोड, चौपाटी रोड (पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येईल)
एम. पी. मिल्स कंपाऊंड, बी. बी. नकाशे मार्ग, ताडदेव (पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील)
आंबेडकर नगर कॉलनी, केशवराव खाड्ये रोड (दक्षिण) (पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील)
२) ई विभाग : के. के. मार्ग, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, कस्तुरबा रुग्णालय (पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील)
मौलाना आझाद रोड, डेल स्ट्रीट, डॉ. आनंदराव नायर रोड, मेघराय सेठी मार्ग, मराठा मंदिर रोड, मोहम्मद शहीद मार्ग, कामाठीपुरा १ ते १४ वी गल्ली, चंद्रमणी बुद्ध विहार रोड, आग्रीपाडा परिसर, डॉ. आनंदराव नायर रुग्णालय.(*पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील)*
३) जी दक्षिण विभाग : जे. आर. बोरीचा मार्ग, साने गुरुजी मार्ग, धोबीघाट.(पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील)
