मुंबई : पुढच्या आठवड्यात दोन दिवस मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरात काही भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. लालबाग, परळ, शिवडी, वडाळा, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी येथील नागरिकांना या पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा सुरू करण्याच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. याअंतर्गत १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी व इतर पूरक कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी तुर्भे उच्चस्तरीय जलाशयाची १८०० मिमी आणि निम्नस्तरीय जलाशयाची १२०० मिमी जलवाहिनी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम मंगळवार, ५ मे रोजी सकाळी १० ते बुधवार, ६ मे रोजी दुपारी ४ पर्यंत असे एकूण ३० तास केले जाणार आहे.
या कामासाठी शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण आणि पूर्व उपनगरातील एल, एम पूर्व, एम पश्चिम व एन विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या विभागातील नागरिकांनी या कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार
प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, संजय गांधी नगर, शांती नगर, एच. एम. मार्ग, के. डी. गायकवाड नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड, अल्मेडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशॉ पेटिट मार्ग, एस. एस. राव मार्ग, डॉ. एर्नेस्ट बोर्जेस मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्ग, एन. एम. जी. एस. मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग ,गोविंदजी केणी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, सेंट पॉल मार्ग, सेंट झेवियर मार्ग, खाशाबा मार्ग, महादेव पालव मार्ग, जिजीभॉय लेन, आचार्य दोंदे मार्ग, विठ्ठल चव्हाण मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बाटलीवाला गल्ली, चमार बाग मार्ग, आई माई मेरवानजी मार्ग, शिरोडकर मार्ग, चिवडा गल्ली, साने गुरुजी मार्ग, आनंद मालवणकर मार्ग, गॅस कंपनी गल्ली, कुर्ला साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांतीनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नवीन टिळक नगर (बुधवार, ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).
मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार
हिल मार्ग, ताडी पेठ, मुक्तादेवी मार्ग, गावदेवी मंडळ, डोंगर परिसर, पाटील गल्ली, गुलमोहर गल्ली, पंचशील नगर, नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदिर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस वसाहत, कुर्ला कारशेड, रेल्वे वसाहत, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, राहुल नगर, एव्हरार्ड नगर, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा स्ट्रीट, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा वसाहत, समर्थ नगर बैंगणवाडी, मानखुर्द, भारत नगर, म्हाडा इमारती, चिता कॅम्प, साठे नगर, झाकिर हुसेन नगर, देवनार गाव, देवनार वसाहत, न्यू भारत नगर, हशू अडवाणी नगर, नटवर पारेख संकुल
