मुंबई : आधीच पाणी टंचाई असताना येत्या गुरुवारी पूर्व उपनगरातील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. वाशीनाका येथे जलद्वार बसविण्याच्या कामासाठी गुरुवार, १३ जून रोजी सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मुंबईतील काही परिसर मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या शेवटच्या टोकाला आहेत. अशा भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पूर्व उपनगरातील बी. डी. पाटील मार्ग, वाशीनाका येथील गवाणपाडा, एच. पी. सी. एल. रिफायनरी या भागांनाही कमी दाबाने पाणीपुरवठा होता. या भागातील पाणीपुरवठ्यामधील दाबामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत ७५० मिलीमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्याचे काम गुरुवारी १३ जून रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्याकरीता पालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम भागात सकाळी ११.०० पासून रात्री ११.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा – चौपाट्यांवर तैनात सुरक्षा रक्षक मूलभूत सुविधांपासून वंचित, सुविधा उपलब्ध करण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

एम पूर्व विभाग – लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, भाभा अणु संशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.), वरुण बेवरेजेस

हेही वाचा – आरोग्य सेविका व आशा सेविकांच्या आंदोलनाची महानगरपालिकेने घेतली दखल, मागण्यांवर सविस्तर चर्चेसाठी बुधवारी बोलावली बैठक

एम पश्चिम विभाग – माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका, मैसूर वसाहत, खाडी मशीन, रामकृष्ण चेंबूरकर (आर. सी.) मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक, चेंबूर छावणी