मुंबई : शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून नफा मिळून देण्याचे आमिष दाखवून ३९ वर्षीय महिलेची ४४ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. फसवणूक झालेल्या महिलेचे पती राष्ट्रीयकृत बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. फेसबुकवरून आरोपी महिलेच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांनी तिची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपी महिलेला शेअर बाजारातून चांगला नफा मिळून देण्याच्या नावाखाली जम्बिन नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले होते. हेही वाचा.एनसीबीकडून ५२ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ नष्ट तिला सुरुवातीला चांगला नफाही होत असल्याचे दिसून येत होते. या महिलेने ५६ व्यवहाराद्वारे ४३ लाख ८७ हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले. तिला ॲप्लिकेशनमध्ये रक्कम जमा झालेली दिसली. त्यानंतर तिने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेला ती काढता आली नाही. त्यामुळे आपली सायबर फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.