scorecardresearch

मुंबईतील धक्कादायक घटना; बलात्कार करुन गुप्तांगात घुसवला रॉड

पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे, मात्र अजून आरोपी सहभागी असावेत असा संशय

Mumbai Woman, Rape, Sakinaka, Saki Naka
महिलेवर बलात्कार करण्यात आला असून यावेळी आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे (प्रातिनिधिक फोटो)

मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आला असून यावेळी आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. साकीनाका परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून काही जण सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. पीडित महिला ३० वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. महिलेवर उपचार सुरु असून स्थिती सध्या खूप गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून आरोपी सहभागी असावेत असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai woman raped rod inserted in private part condition critical sgy

ताज्या बातम्या