मुंबईतील तरुणाची बदलापूरमध्ये हत्या? | Loksatta

मुंबईतील तरुणाची बदलापूरमध्ये हत्या?

तरुणाचा मृतदेह बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळांवर गुरुवारी आढळला

murder
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई येथे राहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळांवर गुरुवारी आढळला. बदलापूर रेल्वे पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राम भोजने (२२) असे या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत पोलीस तपास करीत आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे रामची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळांवर आणून टाकल्याचा आरोप रामच्या वडिलांनी केला आहे.

राम आणि त्याचे कुटुंब हे पूर्वी बदलापूरमध्ये राहत होते. त्यांचे बदलापूर शहरात घर असून याच घरी राम हा अधूनमधून अभ्यास करण्यासाठी येत होता. तसेच शेजारी राहणाऱ्या एका महिलेला त्याने पैसे दिले होते. तेच परत घेण्यासाठी राम गुरुवारी रात्री ९च्या सुमारास मुंबईहून बदलापूरला आला होता.  मात्र काही वेळाने रेल्वे पोलिसांनी रामचा अपघातात मृत्यू झाल्याचे त्याच्या भावाला सांगितले. त्यामुळे याबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. रामचा अपघात झाला नसून पैशाच्या देवाण-घेवाणीतून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळांवर टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2017 at 01:03 IST
Next Story
रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक