scorecardresearch

Premium

‘गोल्डन मॅन’साठी मुंबईकर एकवटले, पोलिसांच्या दमदाटीविरोधात थेट नडले; स्ट्रीट आर्टिस्टने VIDEOद्वारे सांगितलं वास्तव

Golden Man : स्ट्रिट आर्टिस्ट गिरजेश गौड याने सांगितल्यानुसार पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस कर्मचाऱ्याने गोल्डन मॅनशी हुज्जत घालायला सुरुवात केली तेव्हा जमलेल्या मुंबईकरांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला.

Golden Man
गोल्डन मॅनला वांद्र्यात पोलिसांकडून दमदाटी (फोटो – स्क्रीन शॉट/ @goldystatue_)

द लिव्हिंग स्टॅच्यु किंवा गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरजेश गौड या स्ट्रिट आर्टिस्टला वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड येथे मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गिरजेश गौड याने यासंदर्भातील व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. बॅण्ड स्टॅण्डवर झालेल्या या घटनेबाबत त्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे माहिती दिली.

हेही वाचा >> शिवाजी पार्कात कोणाचा दसरा मेळावा होणार? शंभूराज देसाई म्हणाले, “आजपर्यंत जसं…”

Ujjain Accused
Ujjan Rape Case : आरोपीचं घर होणार जमिनदोस्त, उज्जैन महापालिकेचे आदेश
janhavi kandula
जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी सिएटलमध्ये मोर्चा
girl was raped in Mumbai
मैत्रीला कलंक! दिल्लीतील फॅशन डिझायनरवर मुंबईत बलात्कार, पीडितेच्या व्यावसायिक मित्रानेच केला घात!
crime (1)
नागपूर: तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी; क्रिकेट बुकी सोंटू जैनच्या बहिणीसह चौघांवर गुन्हे दाखल

“हा व्हिडिओ काल रात्री ८ च्या सुमारास वांद्रे बॅंडस्टँडवर शूट करण्यात आला आहे. हा मद्यधुंद पोलीस हवालदार माझ्याकडे आला आणि त्याने त्याच्या लाठीने माझ्यावर हल्ला केला. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मला का मारतोय असे विचारले तर त्याने माझ्यावर शिवीगाळ केली. नंतर सर्व लोकांसमोर त्याने माझी मान दाबून धरली आणि मला खेचू लागला. त्यामुळे माझा श्वास रोखला गेला. मला पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्याने दिली. मी एक कलाकार असून मुंबईत माझं कोणीच नाही. Instagram (चाहते) कुटुंबाशिवाय मला कोणीही नाही. मी एकमेव आर्टिस्ट नसून मुंबईत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह अशा स्ट्रिट आर्टवर चालतो. आम्ही आमच्या हक्कांबाबत पोलिसांशी बोललो तर आम्ही गुन्हा केल्याप्रमाणे वागवलं जातं. तुम्हीच आता सांगा आम्ही काय करायला हवं? आम्हाला पाठिंबा द्या आणि हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा”, असं त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

स्ट्रिट आर्टिस्ट गिरजेश गौड याने सांगितल्यानुसार पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस कर्मचाऱ्याने गोल्डन मॅनशी हुज्जत घालायला सुरुवात केली तेव्हा जमलेल्या मुंबईकरांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. आपली कला सादर करणाऱ्या कलाकाराला अडवणाऱ्या पोलिसाविरोधात मुंबईकरांनी एकजूट दाखवली.

या घटनेमुळे पोलीस खात्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. गोल्डन मॅनने अल्पावधीत प्रसिद्ध मिळवली आहे. तो अंगभर सोन्याचा रंग लावून स्तब्ध उभा राहतो. डोळ्यांची पापणीही न हलवता तो दिर्घकाळ एकाच ठिकाणी उभा राहत असल्याने त्याच्या कलेचं कौतुक केलं जातं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbaikars unite for golden man in band stand direct protest against police brutality street artist told the truth through instagram video sgk

First published on: 03-10-2023 at 19:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×