खंडणी प्रकरणात सचिन वाझेला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी!

या अगोदर न्यायालयाकडून ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली गेली होती.

मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात आता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अगोदर याप्रकरणी गुन्हे शाखेकडून जेव्हा १० दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली होती, तेव्हा न्यायालयाने सचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली होती.

तर, गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सीआययू) कार्यरत असताना सचिन वाझेने तपास सुरू केलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे. अशा सुमारे २५ प्रकरणांचा तपास बंद करण्यात आला आहे. ‘सीआययू’चे प्रभारी असताना वाझे तपास करत असलेले १५ गुन्ह्योही इतर विभागांकडे वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

सचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी!

तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला आहे. वाझे हा नजकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटले होते की सचिन वाझेंवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbais esplanade court sends sachin waze to police custody till 13th november msr

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या