Video : रॅपमधून समाजातील समस्या अधोरेखित करणारी मुंबईची ‘गल्ली गर्ल’

मुंबईतील गोवंडीमधील मुस्लिम वस्तीत राहणारी सानिया झोपडपट्टी भागात उद्भवणारे प्रश्न आपल्या रॅपच्या माध्यमातून मांडत आहे.

Saniya Gully Girl
आपल्या रॅपमधून समाजाचे प्रश्न मांडणारी सानिया अवघ्या १५ वर्षांची आहे.

मुंबईतील वास्तव म्हणजे इथे जशी ताऱ्यांची झगमगती दुनिया आहे तशीच कष्टाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्याही इथे खूप मोठी आहे. एकीकडे गगनचुंबी इमारती आहेत तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणावर पसरलेली झोपडपट्टी देखील आहे. हा विरोधाभास कायम असला तरीही प्रत्येक मुंबईकराला मुंबई ही आपली वाटते. तिथे आपल्या स्वप्नांसाठी धडपडणारे खूपजण आहेत. झोडपट्टीतील आपल्या परिस्थितीवर मात करून मोठं होण्याची स्वप्न अनेकजण बघत आहेत. अशीच एक कहाणी आहे मुंबईतील गोवंडीच्या मुस्लिम वस्तीत १० बाय १०च्या खोलीत राहणाऱ्या सानियाची. अकरावीमध्ये शिकणारी सानिया रॅपमधून समाजाचे प्रश्न सर्वांसमोर मांडत आहे. चला तर मग पाहुयात सानियाने मांडलेले प्रश्न…

YouTube Poster

रॅप म्हटलं की साहजिकच एखाद्या मुलाचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. पण १५ वर्षाची सानिया जेव्हा रॅप करते तेव्हा सर्वच तिचं कौतुक करतात. आधी आपल्या समस्या मांडायच्या असतील तर वृत्तपत्र, मासिके, नियतकालिकं, वृत्तवाहिन्या अशी माध्यमं होती. पण आजची पिढी आपल्या समस्या मांडण्यासाठी या आणि नव्या समाजमाध्यमांचा अगदी उत्तम वापर करत असल्याचं दिसतंय.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbais gully girl who underlines the problems of the society through rap pvp

Next Story
“शीना बोरा जिवंत असून काश्मीरमध्ये आहे,” इंद्राणी मुखर्जीचा सीबीआयला पत्र लिहून धक्कादायक दावा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी