मुंब्र्याजवळ अमोनिया टँकर कोसळून गॅसगळती

सुरतहून तळोज्याला जाणाऱ्या अमोनिया गॅसने भरलेल्या टँकरला अपघात झाला आहे.

सुरतहून तळोज्याला जाणाऱ्या अमोनिया गॅसने भरलेल्या टँकरला अपघात झाला आहे. पहाटे दोनच्या सुमारास मुंब्रा बायपासवरुन जात असताना टँकर कोसळल्याची घटना घडली.
gas-leakage450
 तब्बल १४५० टन अमोनिया गॅस असलेला एक टँकर मुंब्रा बायपासवरून जाताना कोसळला. अपघातानंतर टँकर हलवलताना टँकरचा वॉल्व निघाला आणि गॅसगळती सुरु झाली आहे. त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं सैनिकनगर, कौसा भागातील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे. ठाणे महापालिकेच्या आपात्कालिन कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbra bypass road accident ammonia gas leakage

ताज्या बातम्या