मुंबई : मुंबईतील हिवताप नियंत्रणासाठी पालिकेने कृती आराखडा तयार केला असून शहरात हिवतापाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या विभागांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.  मुंबईत २०१७ पासून हिवताप निर्मूलनाची मोहीम सुरू आहे. करोनाकाळात हिवताप नियंत्रणाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील हिवतापाच्या रुग्णांची संख्या पुन्हा पाच हजारांवर गेली आहे. त्यामुळे आता पालिकेने हिवताप नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार केला असून याची अंमलबजावणी या वर्षांपासून करण्यात येणार आहे.

हा आराखडा २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी असून यात प्रामुख्याने हिवतापाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असलेल्या विभागांमध्ये नियंत्रणासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या भागांमध्ये घराघरांमध्ये रुग्ण तपासणीसाठीचे सर्वेक्षण, डासांची उत्पत्ती वाढू नये यासाठी घरोघरी केल्या जाणाऱ्या तपासण्या आणि इतर उपाययोजनांवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

 मुंबईमध्ये जी दक्षिण म्हणजेच परेल, वरळी, एल्फिन्स्टन या भागांमध्ये हिवतापाचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात जास्त असल्याचे आढळले आहे. पडक्या इमारती, बांधकामे, मोकळय़ा जागा आदी ठिकाणी डासांची मोठय़ा प्रमाणावर पैदास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा विभागांमध्ये डासांच्या नियंत्रणासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच घरोघरी हिवतापाच्या तपासण्या वाढविण्यासाठी, रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठीही या कृती आराखडय़ामध्ये ठोस उपाययोजनांचा समावेश केला जात असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. मुंबईत जी दक्षिणसह ई (मुंबई सेंट्रल, भायखळा, कामाठीपुरा), एफ दक्षिण (परेल), जी उत्तर (दादर, माहीम, धारावी) डी (ग्रॅण्ट रोड) या विभागांमध्ये हिवतापाचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांमध्ये जास्त आढळत आहे.

हिवतापाचे रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी

वर्ष ……..रुग्ण ……….मृत्यू

२०१७……६०१९……….६

 २०१८ ……५०५१……….३

 २०१९ …….४३५७………..०

२०२०……..५००७……….१

२०२१………५१९३……….०

डासांच्या उत्पती प्रतिबंधासाठी पाण्याच्या टाक्यांच्या तपासण्यांचे काम सुरू झाले आहे. ज्या टाक्यांना झाकणे नीट नाहीत किंवा अन्य काही त्रुटी आहेत अशा आस्थापनांना नोटीस देऊन ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच २४ विभागांमधील पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्यांच्याही तपासण्या आणि व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

– राजन नारिंग्रेकर, पालिकेच्या कीटनकनाशक विभागाचे अधिकारे

खासगी डॉक्टरांनाही रुग्ण कळविणे बंधनकारक

हिवतापाचे रुग्ण आढळल्यास त्याची माहिती पालिकेला देणे खासगी डॉक्टरांना बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र ई-मेल आयडी दिला जाईल. यावर डॉक्टरांना रुग्णाची माहिती देण्यासंबधी सूचना दिल्या जातील. यासाठी खासगी डॉक्टर, फॅमिली फिजिशियन यांच्या बैठका घेऊन सर्व माहिती देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.