मुंबई : मुंबईतील हिवताप नियंत्रणासाठी पालिकेने कृती आराखडा तयार केला असून शहरात हिवतापाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या विभागांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.  मुंबईत २०१७ पासून हिवताप निर्मूलनाची मोहीम सुरू आहे. करोनाकाळात हिवताप नियंत्रणाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील हिवतापाच्या रुग्णांची संख्या पुन्हा पाच हजारांवर गेली आहे. त्यामुळे आता पालिकेने हिवताप नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार केला असून याची अंमलबजावणी या वर्षांपासून करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा आराखडा २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी असून यात प्रामुख्याने हिवतापाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असलेल्या विभागांमध्ये नियंत्रणासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या भागांमध्ये घराघरांमध्ये रुग्ण तपासणीसाठीचे सर्वेक्षण, डासांची उत्पत्ती वाढू नये यासाठी घरोघरी केल्या जाणाऱ्या तपासण्या आणि इतर उपाययोजनांवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal action plan malaria control focus areas highest incidence malaria ysh
First published on: 18-05-2022 at 00:02 IST