समाजमाध्यमांवर मजकूर प्रसिद्ध झाल्याने चर्चांना उधाण

iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

मुंबई : घाटकोपर येथील पंधरा वर्षीय मुलीचा लसीकरणाने मृत्यू झाल्याचे आरोप करणारे वृत्त व छायाचित्र समाज माध्यमांमध्ये पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या मुलीचा मृत्यू हा लसीकरणामुळे झाला नसल्याचा दावा पालिकेच्या यंत्रणेने केला आहे. या प्रकरणी वैद्यकीय पातळीवर चौकशी तसेच पोलिसांकडूनही तपास सुरू आहे. तसेच समाज माध्यमांवर मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरू आहे.

घाटकोपर मध्ये राहणाऱ्या आर्या नावाच्या मुलीने ८ जानेवारीला राजावाडी रुग्णालयात लस घेतली होती, तर १२ जानेवारीला तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू लसीकरणामुळे झाला असल्याचा मजकूर तिच्या छायाचित्रासह एका व्यक्तीने समाजमाध्यमांवर टाकला होता. त्यामुळे पालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून पालिकेने समाजमाध्यमावरच या व्यक्तीकडे पुरावे मागितले आहेत. मात्र त्याने काहीच उत्तर दिलेले नाही.

मात्र या घटनेनंतर  महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. महापौरांनी शनिवारी मुलीच्या कुटुंबीयांची घाटकोपर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.  त्यावेळी महापौर म्हणाल्या की आर्याच्या आजोबांच्या म्हणण्यानुसार लसीकरणामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झालेला नाही. अभ्यासाचा तिने अतिताण घेतल्याने ते असह्य होऊन हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू ओढवला आहे. या दु:खद प्रसंगी कोणीही यामध्ये राजकारण आणता कामा नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

‘दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीचा शोध’

याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की लसीकरणाच्या चार-पाच दिवसानंतर तिचा मृत्यू झाला असून खासगी डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असे म्हटले आहे. तरीही लसीकरणाच्या परिणामाबाबत अभ्यास करणाऱ्या ‘अडवर्स इव्हेंट फोल्लोईंग ईम्युनायझेशन’ या समितीला या प्रकरणाचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पोलिसांच्या पातळीवरही तपास सुरू असून समाजमाध्यमांवर मजकूर टाकून लोकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.