पर्यायाचा विचार करण्याचे आश्वासन

मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसवर (पीओपी) घातलेल्या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात पालिकेकडून चालढकल सुरू आहे. मुंबईतील मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून कडाडून विरोध होत असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी पालिकेने मूर्तिकार, मंडळांचे पदाधिकारी आदींची दृकश्राव्य पद्धतीने बैठक आयोजित केली होती. मात्र न्यायालयाने बंदीचे आदेश दिलेले असताना पीओपीला पर्याय शोधण्याचे आश्वासन देत ही बैठक गुंडाळण्यात आली.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष
electric furnace manufacture by balaji amines shutdown as soon as handed over to municipal corporation
बालाजी अमाईन्सने उभारलेली विद्युतदाहिनी पालिकेकडे हस्तांतर करताच पडली बंद

गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात मूर्ती घडवण्यासाठी पीओपीचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे  २०२० मध्ये पीओपी बंदीबाबत नियमावली जाहीर केली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयानेही दिले. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी उत्सवकाळ जवळ आल्याने होऊ शकली नाही. या निर्णयाला जानेवारी २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. गणेशोत्सवानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये पालिकेने पीओपी बंदीबाबत मोर्चेबांधणी सुरू केली. आगामी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या जातील याबाबत पालिका आग्रही होती. परंतु आता मात्र या निर्णयात चालढकल होताना दिसत आहे.

मूर्तिकार, मंडळे यांच्याकडून पीओपी बंदीला वारंवार विरोध होत आहे. मूर्तिकारांना जागा, पर्यायी साधन याबाबतच्या अडचणीत आहेत. तर पीओपी बंदीनंतर  मुंबईची ओळख असलेला उंच मूर्तीचा गणेशोत्सव बंद होईल अशी खंत मंडळांना आहे. निर्णयांची अंमलबजावणी होण्याआधी आमच्याशी सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी मूर्तिकार  आणि मंडळकडून होत होती. त्यानुसार सोमवारी पालिकेने आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीत मूर्तिकार, मंडळे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांनी आपली बाजू मांडली. त्यांनतर मूर्तिकारांच्या उपजीविकेचा मुद्दा लक्षात घेऊन पीओपीला पर्यायी साधन शोधण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासंदर्भात अभ्यास करून पुढील महिन्यात दुसरी बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले. यावेळी नियमावलीचे वाचन ‘परिमंडळ २’चे उपायुक्त हर्षद काळे यांनी केले.

 मूर्तिकारांचे म्हणणे

 पीओपीच्या मूर्ती कमी वेळेत तयार होत असून त्या वजनाला हलक्या असतात. मातीमध्ये मोठय़ा मूर्ती घडवणे शक्य नाही, त्यामुळे पालिकेने पीओपीला पर्याय सुचवावा, तसेच सवलतीच्या दारात सहा महिने जागा उपलबध करून देण्याबाबतही विचार करावा.

समितीकडून स्थगितीची मागणी

आमचा पर्यावरणपूरक मूर्तीना पूर्ण पाठिंबा आहे. परंतु केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमावलीत काही त्रुटी आहेत. त्या अधोरेखित करून त्यासंदर्भात पालिकेला पत्र दिले आहे. पीओपी बंदी करायची तर पर्यायांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शन करावे. तोवर पीओपी बंदीला स्थगिती द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी केली. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या आणि न्यायालयाने आदेश दिलेल्या पीओपी बंदीच्या निर्णयाचा अवमान आपण करू शकत नाही. परंतु मुंबईत होणारा उत्सव लक्षात घेता येथील समस्या वेगळय़ा आहे. मूर्तिकारांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. बंदी लागू करताना कोणावरही अन्याय होता काम नये. म्हणून पीओपी बंदीबाबत पर्यायांचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संवाद साधला जाईल. त्यावर अभ्यास करून पुढील बैठक होईल.

– हर्षद काळे, उपायुक्त, ‘परिमंडळ २’