BMC Officers at Narayan Rane's Juhu Bungalow : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेचे आठ अधिकारी सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहचले आहेत. तर, दुसरीकडे राणेंच्या बंगल्याबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोसबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. नारायण राणे हे स्वत: बंगल्यात उपस्थित असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती.