मुंबई : चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि फ्रान्स आदी देशांमध्ये करोनो रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने केंद्र सरकारकडून देशातील आरोग्य सुविधाचा २७ डिसेंबरला आढावा घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. मुंबईतील रुग्णालये पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यात आली असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईमध्ये महानगरपालिकेची १०, शासकीय तीन व २१ खासगी रुग्णालय असून, या रुग्णालयांमध्ये २१२४ विलगीकरण खाटा आहेत. प्राणवायूची सुविधा असलेल्या १६१३, अतिदक्षता विभागातील ५७९ व जीवन रक्षक प्रणाली असलेल्या १०४९ खाटा उपलब्ध आहेत. तसेच या सर्व रुग्णालयांमध्ये ३२४५ डॉक्टर व ५७८४ परिचारिका असून, त्यातील २८२८ डॉक्टरांना व ४०२९ परिचारिकांना करोना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळालेले आहे.याशिवाय ३४५३ निमवैद्यकीय कर्मचारी असून, त्यातील ३२४६ कर्मचाऱ्यांनाही करोना व्यवस्थापन प्रशिक्षण दिले गेले आहे. करोना रुग्णांसाठी मुंबईमध्ये बीएलएस प्रकारातील ४६ रुग्णवाहिका असून, एएलएस प्रकारातील २५ रुग्णवाहिका आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारी असलेल्या किंवा गैर शासकीय संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या २१ रुग्णवाहिका असून, १०८ क्रमांकाच्या ९६ रुग्णवाहिका आहेत.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
post of Health Director City
‘आरोग्य संचालक शहर’ हे पद तीन वर्षांनंतरही कागदावरच, शहरी आरोग्याविषयी सरकार उदासीन…
Thane Police Department Applications are invited For Police Constable and Driver Candidates Till Thirty First March
Thane Police Bharti 2024 : पोलीस विभागात नोकरी करण्याची संधी! बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर

हेही वाचा – राज्यात करोनाची सक्रिय रुग्णसंख्या कमी; ९८ टक्के रुग्ण ठणठणीत

करोना दैनंदिन चाचणी करण्याची क्षमता ३४ रुग्णालये आणि ४९ प्रयोगशाळांमध्ये आहे. रेमडेसेवीर, टॉसीलोझुम्यॅब, मिथाईलप्रेडनिसोलोन , डेक्सामेथाझोन, अँफोटेरीसिन बी, पॉस्कोनयाझोल इत्यादी करोनावरील औषधांचा साठा उपलब्ध आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास या औषधांची खरेदी केली जाईल आणि ती रुग्णालयांना उपलब्ध करून दिली जातील. पुरेशा प्रमाणात पीपीई किट, एन-९५ मुखपट्टी, नेब्युलायझर, शरीरातील प्राणवायूची पातळी तपासणारी यंत्रे उपलब्ध आहेत. तसेच ८५९ प्राणवायू कॉन्सनट्रेटर असून, २३९९ प्राणवायूच्या टाक्या असून, द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू २६८ मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे.

नियंत्रण कक्षाद्वारे रुग्णांना मदत 

महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांतील २४ तास सुरू असणाऱ्या नियंत्रण कक्षांद्वारे करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली जाईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.