मुंबई : व्यावसायिक जिग्नेश दोशी (४५) व त्यांची पत्नी काश्मिरा दोशी यांच्या मृत्यूप्रकरणी चार वर्षांनंतर कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नी काश्मिरा यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे न्यायवैधक अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल गुरुवारी प्राप्त झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. करोनाच्या आर्थिक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून घरभाडे देऊ शकले नसल्याने पती जिग्नेश दोशीने पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा प्रकार २५ ऑगस्ट, २०२० रोजी घडला होता. दोशी यांचा १७ वर्षांच्या मुलगा घरी आला. त्यावेळी त्याची आई मृतअवस्थेत खाटेवर पडली होती. त्यानंतर त्याने वडिलांना जोरात हाक मारली. मात्र, वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचदरम्यान, त्याला शौचालयाचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी दरवाजा ढकलला असता वडिलांनी शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, मृतदेहाच्या शेजारी सापडलेल्या चिठ्ठीसापडली होती. त्यात करोनाच्या आर्थिक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून घर भाडे देऊ शकले नसल्याने या जोडप्याने आत्महत्या केली.

हेही वाचा…गोविंदा अद्याप विम्यापासून वंचित, विमा संरक्षणावरून दोन संस्थांमध्ये वादाची हंडी

याप्रकरणी मृत काश्मिरा यांच्या मृत्यूचा अहवाल कांदिवली पोलिसांना प्राप्त झाला असून त्याच्या आधारावर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपासात आरोपी जिग्नेश दोशीने कापडी पट्ट्याने प्रथम काश्मिरा गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्यामुळे त्याने कापडी पट्ट्याने शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृत जिग्नेश दोशीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा मृत्यू झाला असल्यामुळे गुन्हा बंद करण्याबाबतची प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder case registered four years after death of jignesh doshi and wife kashmira forensic report reveals strangulation mumbai print news psg
Show comments