scorecardresearch

मुंबई : मालवणीत विवाहीत महिलेची हत्या

मालाड मालवणी येथीलअनारकली गेट क्रमांक ७ येथे हा प्रकार घडला,

In Pune crowd spreading terror by celebrating birthday on street
वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत

मालवणी येथे २४ वर्षीय विवाहीत महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून शवविच्छेदन अहवालात महिलेचे तोंड व गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मालवणी पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. शाहिदाबेगम झुबेर आलम असे मृत महिलेचे नाव आहे. मालाड मालवणी येथीलअनारकली गेट क्रमांक ७ येथे हा प्रकार घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एक महिला बेशुद्धावस्थेत असल्याचा दूरध्वनी शनिवारी पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यांनी याबाबतची माहिती मालवणी पोलिसांना दिल्यानंतर
पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तेथील घरात महिलेचा पती झुबेर नौशाद आलम होता. त्याने शाहिदा गेल्या दोन दिवसांपासून आजारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेशुद्धावस्थेत असलेल्या महिलेला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली.

त्यानंतर शवविच्छेदन अहवालात महिलेचे तोंड व गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश शिवरकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मालवणी पोलिसांनी सोमवारी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder married woman in malvani crime malvani police mumbai print news amy

ताज्या बातम्या