scorecardresearch

मुंबई:प्रेयसीसोबत फिरणाऱ्या तरुणाची भरस्त्यात हत्या

प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून प्रियकराने साथीदाराच्या मदतीने एका तरुणाची भररस्त्यात हत्या केल्याची घटना गुरुवारी चेंबूर परिसरात घडली.

murder case
प्रेयसीसोबत फिरणाऱ्या तरुणाची भरस्त्यात हत्या(प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून प्रियकराने साथीदाराच्या मदतीने एका तरुणाची भररस्त्यात हत्या केल्याची घटना गुरुवारी चेंबूर परिसरात घडली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

हेही वाचा >>>मुंबई: पहिली मेट्रोसदृश लोकल पश्चिम रेल्वेवर

चेंबूरच्या ललालडोंगर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाची गुरुवारी सायंकाळी हत्या करण्यात आली. तो गुरुवारी सायंकाळी घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर भररस्त्यात चाकूने वार केले. चुनाभट्टी पोलिसांनी तात्काळ या तरुणाला परिसरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मयत तरुण परिसरातील एका तरुणीसोबत फिरत होता. ही बाब तिच्या प्रियकराला समजल्यानंतर त्याने त्याची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार चुनाभट्टी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 15:44 IST
ताज्या बातम्या