अंधेरीत महिलेची हत्या

मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी परिसरात एका २५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे.

woman murder in pune
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी परिसरात एका २५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून आठ दिवसांपूर्वी याच इमारतीत ती दोन व्यक्तींसोबत कामासाठी आली होती. दरम्यान बुधवारी इमारतीचा सुपरवायझर कामगार वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीत पाहणी करण्यासाठी गेला असता एका झोपडीत ही महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर व्रण असल्याचे पाहून तेथील नागरिकांनी अंधेरी एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या महिलेसोबत असलेले राजीव उर्फ सुनाई व राजू शेख हेही गायब झाल्याचे उघड झाले. गेल्या दोन दिवसांपासून हे दोघेही कामावर आलेले नाहीत. त्यांचा दूरध्वनी येत असून या दोघांनी महिलेची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी अंधेरी एमआडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांचा शोध सुरू केला आहे. तर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder woman building supervisor slums unconscious mumbai print news ysh

Next Story
“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी