Music composer Nandu Ghanekar passed away mumbai print news ssb 93 | Loksatta

मुंबई : संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन

संगीतकार घाणेकर यांच्या पार्थिवावर बाळकूम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Nandu Ghanekar passed away
संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन (image – लोकसत्ता टीम)

संगीतकार नंदू घाणेकर यांचे सोमवारी हृदयवविकाराच्या झटक्याने सकाळी नऊ वाजता निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी ठाणे येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण; तीन आठवड्यांत CBI भूमिका स्पष्ट करणार

हेही वाचा – मुंबई : सहा ते नऊ महिन्यांच्या बालकांच्या लसीकरणाची व्याप्ती वाढवणार

संगीतकार घाणेकर यांच्या पार्थिवावर बाळकूम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचे बंधू नंदू घाणेकर यांनी गेली अनेक वर्षे संगीत दिग्दर्शन केले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवला होते. ‘ताऱ्यांचे बेट’, ‘शाली’’, ‘सुनंदा’, ‘नशीबवान’ या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. याशिवाय काही संगीत अल्बमची निर्मितीही केली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:57 IST
Next Story
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण; तीन आठवड्यांत CBI भूमिका स्पष्ट करणार