मुंबई : स्वरसूर्य पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजाचे वर्णन आपल्या लेखात करताना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ कलावती डॉ. प्रभा अत्रे म्हणतात, ‘‘उतार वयातही भीमसेनजींचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहूबाजूंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकायचा. साऱ्या वातावरणात भरून राहायचा. या आवाजात जबरदस्त मास अपील आहे. भीमसेनजींचा आवाज किराणा घराण्यातील इतर गायकांच्या आवाजापेक्षा कितीतरी वेगळा, रुंद, घुमारदार, पीळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा. याचबरोबर किराणाची इतर वैशिष्ट्य – सुरेलपणा, स्वरांची आस, गोडवा हीही त्या गाण्यात आहेतच. ”

पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकसत्ताने ‘भीमसेन’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या अंकात संगीत दिग्गजांनी स्वरसम्राटाबद्दल शब्दचित्रे रेखाटली आहेत. लेख, छायाचित्रे आणि आठवणी यामुळे तो केवळ वाचनीयच नसून संग्राह्यही झाला आहे. संगीतप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या या अंकाची प्रत बाजारात

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

उपलब्ध झाली असून जवळच्या विक्रेत्याकडून आजच

मिळवा.

बुजुर्ग आणि समकालीन..

डॉ. प्रभा अत्रेंप्रमाणेच संगीतक्षेत्रातील इतरही मान्यवरांनी पंडितजींच्या आठवणी लेखांतून जागवल्या आहेत. त्यामध्ये पंडित सत्यशील देशपांडे, कु मार गंधर्व यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांबरोबरच आजच्या पिढीतील कौशिकी चक्रवर्ती, आनंद भाटे यांसारख्या कलाकारांचे, संगीत अभ्यासकांचे लेख आहेत. 

प्रायोजक…

मुख्य प्रायोजक :

पिनॅकल ग्रुप

सहप्र्रायोजक :

महाराष्ट्र औद्योगिक

विकास महामंडळ (एमआयडीसी),

पुनीत बालन ग्रुप