महापालिकांत तीन सदस्यीय प्रभाग पद्धत

काँग्रेस मंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली.

काँग्रेसचा विरोध डावलला; मंत्रिमंडळ बैठकीत वाद

मुंबई : महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय  प्रभाग पद्धत लागू करण्याच्या निर्णयावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी वादावादी झाली. तीनऐवजी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत असावी, अशी मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी के ली असता शिवसेनेचे मंत्री तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीवर ठाम राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्रिसदस्यी प्रभाग पद्धतीचे समर्थन केले.

महानगरपालिके त तीन तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. काँग्रेसने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध दर्शविला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या मंत्र्यांनी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करावा व त्याऐवजी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याची मागणी के ली. यावरून शिवसेना व काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये मतभेद झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तीनऐवजी दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीला पाठिंबा दर्शविला.

काँग्रेस मंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली. तीन सदस्यीय प्रभाग पद्धती कशी फायद्याची ठरेल याचा त्यांनी युक्तिवाद के ला. शिवसेनेने तीन सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवावी व त्यात बदल करू नये, अशी मागणी के ली. सध्या तरी तीन सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवू, नंतर काही तांत्रिक मुद्दे समोर आल्यास विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये मात्र या निर्णयावरून नाराजी आहे.

काँग्रेसने विरोध के ला तरीही आगामी महानगरपालिका निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धत कायम राहणार आहे. या संदर्भात अध्यादेश काढून कायद्यात सुधारणा के ली जाईल. नवी मुंबई, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने के ली आहे. या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळेच अध्यादेश काढून कायद्यात सुधारणा के ली जाईल. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे पुन्हा प्रभागांची नव्याने रचना करावी लागेल. त्यात कालावधी जाणार आहे.

करोनाच्या उपचाराधीन रुग्णांपैकी ४६ टक्के रुग्णालयात

राज्यात करोनाचे ३७ हजार ८६० रुग्ण उपचाराधीन असून त्यापैकी १७ हजार ४५२ म्हणजे ४६.१ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. दैनंदिन करोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देऊनही गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये चाचण्यांची संख्याही एक लाख ३० हजार ते एक लाख ७० हजारांच्या दरम्यान आहे. राज्यातील करोना परिस्थितीचा साप्ताहिक अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी सादर करण्यात आला.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्यात जूनपासून सतत कोणत्या ना कोणत्या भागात अतिवृष्टी सुरू असल्याची व त्यामुळे बहुतांश भागात खरीप पिके  संकटात सापडल्याबाबतही अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त के ली. मंगळवारी मराठवाडय़ाला अतिवृष्टीने झोडपले व त्याआधी उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती. सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या अतिवृष्टीचे प्रमाण व नुकसान पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी के ली.

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेबाबत नाराजी

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील परीक्षा गोंधळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. भरती प्रक्रि येची जबाबदारी देताना कोणत्या निकषांवर कं पन्यांची निवड के ली जाते, त्यानंतर परीक्षा प्रक्रि येतील गोंधळामुळे राज्य सरकारबाबत नाराजी निर्माण होते अशी तक्रार करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व प्रक्रि येची माहिती मागवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाला सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mva government approved multi member ward system for municipal corporations zws

ताज्या बातम्या