‘युनिक फिचर्स’च्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या चौथ्या ई-मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची निवड झाली आहे. समकालीन साहित्यावर निखळ चर्चा व्हावी, या चर्चेत थेट वाचकांनाही सहभागी होता यावे, आणि तरुण पिढीला या संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्याकडे वळवावे या उद्देशाने हे संमेलन सुरू करण्यात आले आहे.
पहिले ई-मराठी साहित्य संमेलन २०११ मध्ये आयोजित करण्यात आले होते. चौथ्या ई-मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन २४ मार्च रोजी नाशिक येथे कविवर्य कुसुमाग्रज सभागृहात होणार असून त्या दिवशीपासूनच ते सर्वासाठी खुले होणार असल्याची माहिती युनिक फिचर्सचे संपादक-संचालक डॉ. सुहास कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी यांनी दिली.
हे संमेलन युनिक फिचर्सच्या ६६६.४ल्ल्र०४ीऋीं३४१ी२.्रल्ल  या संकेतस्थळावर वाचक आणि साहित्यप्रेमींसाठी खुले असणार आहे.
ई-मराठी साहित्य संमेलनाची वैशिष्टय़े
*मुलाखत, चर्चा, गप्पा, कवी संमेलन, मुक्त कट्टा असे विविध कार्यक्रम दृकश्राव्य स्वरूपात
*रसिकांना घरबसल्याही सहभागी होणे शक्य.
*‘वेब डॉक्युमेंटेशन’ हा उपक्रम
*मराठीतील १० साहित्यिकांचे वेब डॉक्युमेंटेंशन
*सदर माहिती संकलन मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध होणार