मुंब्र्यामधील २०-३० हजार मतदारांची नावं यादीतून गायब; जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा आव्हाडांचा आरोप

पालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे असे आव्हाड यांनी म्हटले आहे

names 30 thousand voters Mumbra disappeared voter list Jitendra Awhad alleges that the Collector is responsible

मुंब्र्यामधील २०-३० हजार मतदारांची नावे जाणीवपूर्वक मतदार याद्यांमधून कापली जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पुढील वर्षी ठाणे महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येत आहेत. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीववर जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगर पालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. मुंब्रा येथे २० ते ३० हजार मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. त्यासाठी स्थलांतरण असा शेरा मारण्यात आलेला असला तरी सद्यस्थितीमध्ये ते मतदार त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत.

“असं लक्षात आले आहे की मुंब्र्याच्याच मतदार यादीमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये महापालिकेच्या काळामध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आला आहे. मुंब्र्यामध्ये जवळपास २० ते ३० हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यासंदर्भातील कर्मचारी तिथे जातच नाहीत. ही नावे गहाळ झाली आहेत त्याला जबाबदार कोण? याला जबाबदार जिल्हाधिकारी आहेत आहेत कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होते,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

ही नावे वगळण्यामागे जिल्हाधिकार्‍यांची असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे मतदार याद्यांची फेरतपासणी करावी आणि जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहे ते स्थलांतरण रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.  दरम्यान,संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत आहेत असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Names 30 thousand voters mumbra disappeared voter list jitendra awhad alleges that the collector is responsible abn

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या