मुंबई : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोवा येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कलाक्षेत्रातील अनेक दिग्ग्ज कलाकरांकडून नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. यात नानांच्या घरातील गणेशोत्सवाची छायाचित्रे कलाकारांनी समाज माध्यमांवर प्रसारित करत त्यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. नानांच्या घरी अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. अगदी नुकताच झालेल्या गणेशोत्सवातही त्यांनी आपल्या घरी गणेशमूर्तीची स्थापना केली होती. ‘मी पूजापाठ करत नाही किंवा मी भक्त आणि भाविकही नाही मात्र, फुलांची सजावट मी करतो’, असे म्हणणाऱ्या नाना पाटेकर यांनी आपल्या घरी गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवण्यामागे एक विशेष कारण होते.

एक प्रतिभावान आणि सामाजिक भान असणारा कलाकार म्हणून नाना पाटेकर प्रसिद्ध होते. विविध चित्रपट आणि नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली. नानांच्या घरी गणेशोत्सव थाटात साजरा करण्यात येतो. गणरायाची वैशिट्यपूर्ण मूर्ती, आभूषणे आणि कंठी, सुंदर आणि पर्यावरणपूरक सजावट व विविध रंगांच्या फुलांची आरास ही त्यांच्या घरातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये. नानांचा पुत्र मल्हार पाटेकर यांचाही उत्साही सहभाग गणशोत्सवात दिसून येतो. गणेशोत्सवादरम्यान नाना यांच्या घरी भेट देणाऱ्या कलाकारांची, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची संख्याही मोठी होते. यातील अनेकजण समाजमाध्यमांवर आपल्या अनुभवांसह छायाचित्रे प्रसिद्ध करतात. यंदाही प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री अदिती सारंगधर यांच्यासह अनेकांनी छायाचित्रे प्रसिद्ध करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

या कारणामुळे नानांनी जपली परंपरा

नाना पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी घरातील गणेशोत्सवाची परंपरा का जपली आहे याचे उत्तर दिले होते. ते म्हणाले होते, ‘मी पूजापाठ वैगरे करीत नाही, मी फक्त फुलांची सजावट करतो. पूजापाठ मुले करतात. त्यात माझा काहीही सहभाग नसतो. मी भक्त वगैरे अजिबात नाही. मात्र, माझे वडील गेल्यानंतर माझ्या आईसाठी मी ही गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवली. देव या संकल्पनेवर माझा विश्वास आहे.

मात्र, मंदिरात जाणे किंवा नवस वैगरे बोलणे यापासून मी दूर असतो.’ दरम्यान, नाना पाटेकर यांच्या आई निर्मला पाटेकर यांचे जानेवारी २०१९ मध्ये वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतरही त्यांच्या घरातील गणेशोत्सवाची परंपरा अखंड सुरू असून यंदाही त्यांच्या घरी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.