मुंबई/पुणे : दमदार संवादफेक, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कलावंत, अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील निवासस्थानी निधन झाले. ‘क्रांतीवीर’, ‘परिंदा’, ‘खामोशी’, ‘प्रहार’ यासारख्या असंख्य सिनेमात अविस्मरणीय भूमिका साकारणारा हा झंझावात पहाटेच्या एकांतसमयी अचानक शांत झाला. केवळ मनोरंजन नव्हे तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सहज वावरणार्या या मनस्वी कलावंतावर गुरुवारी रात्री पुण्यातील डोणजे येथील फार्महाऊस येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पणजीजवळील डोना पॉला येथील निवासस्थानी पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४५ मिनिटे सीपीआर दिल्यानंतरही पाटेकर यांना वाचविता आले नाही. पहाटे ५.१० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या मृत्यूबाबत ‘मेडिको-लीगल’ (वैद्यकीय-कायदेशीर) प्रकरण नोंदवण्यात आले आहे.
नाना पाटेकर यांनी पहाटे ३.३० वाजता आपल्या एका मित्राला संदेश पाठवून आपली प्रकृती ठीक नसल्याचे कळविले होते, असे वरिष्ठ डॉक्टर शेखर साळकर यांनी सांगितले. त्या मित्राने पहाटे ४ वाजता तात्काळ पाटेकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. पाटेकर तिथे एका केअरटेकर बरोबर राहत होते. पाटेकर यांच्या प्रकृतीबाबत खासगी रुग्णालयाला कळविण्यात आल्यानंतर त्यांच्या घरी रुग्णवाहिका पाठविण्यात आली, असे डॉ. साळकर यांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पणजीजवळील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला, अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली.
हिंदीसह मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला. विश्वनाथ पाटेकर असे नाव असलेल्या या अभिनेत्याला पडद्यावर मात्र नाना पाटेकर या नावाने ओळखले जाऊ लागले. विजया मेहता यांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. पुरुष, महासागर या नाटकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. १९७८ मध्ये ‘गमन’ या हिंदी चित्रपटात छोटेखानी भूमिका करून त्यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. मीरा नायर यांच्या १९८८ मधील ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटात त्यांनी स्थानिक गुडाची व अमली पदार्थ विक्रेत्याची भूमिका साकारली. ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि समीक्षकांची पसंती लाभलेल्या बड्या अभिनेत्यांच्या श्रेणीत त्यांचे स्थान पक्के झाले. परिंदा, क्रांतिवीर, अंकूश, अपहरण, राजनीती, यशवंत हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखले जाणारे काही चित्रपट. सिंहासन, माफीचा साक्षीदार, देऊळ, प्रकाश बाबा आमटे- द रिअर हिरो यांसह विविध मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. पाटेकर यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याशिवाय तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अनेक फिल्मफेअर, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी नाना यांना गौरविण्यात आले.
नाना पाटेकर हे केवळ अभिनेते म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जात. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह त्यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केले. दुष्काळाच्या काळात शेतकर्यांसाठी या संस्थेने केलेल्या कार्यामुळे त्यांना मोठी प्रशंसा मिळाली.
