मुंबई : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी सकाळी गोवा येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कलाक्षेत्रासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. रंगमंच असो किंवा रुपेरी पडदा माध्यम कोणतेही असो उत्तम भूमिका वठवणारा हा अवलिया कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात देखील खंबीरपणे जगला. नाना पाटेकर यांनी दिलेल्या काही मुलाखतींमधून जगण्याच्या विविध पैलूंसह ‘मृत्यू’वरही भाष्य केले होते. ‘मृत्य सतत आपल्याबरोबर असतो. जो आपल्याबरोबर आहे त्याची भीती का बाळगावी ? साथ फक्त तो देणारा आहे. सतत माझ्याबरोबर असलेला. शाश्वती कशाचीच नाही.’ असे त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते.
दिग्गज अभिनेते, एक उत्तम व्यक्ती आणि सामाजिक भान असलेला कलाकार म्हणून नाना पाटेकर यांची ओळख होती. मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले. नानांच्या अनेक मुलाखती ऐकण्यासारख्या आहेत. विशेषतः त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची सकारात्मकता आणि विनयशीलता यांचे दर्शन होत असे. अशाच एका मुलाखतीतील ते मृत्यूविषयी आपले विचार व्यक्त करताना म्हणतात, ‘आपण किती जगणार किंवा
कधी मरणार हे माहीत असते ,का आपल्या काहीही माहीत नसते. जन्माला आल्यापासून मित्र नाहीत, आई-वडील, भाऊ कुणीही आपल्याबरोबर नसते. मृत्यू सतत आपल्याबरोबर असतो. जो आपल्याबरोबर आहे त्याची भीती का बाळगावी ? फक्त तो साथ देणारा आहे. सतत माझ्याबरोबर असलेला. शाश्वती कशाचीच नाही , मरणावर विश्वास ठेवा’, असं मी कायम म्हणतो, मग जगण्याची काय गंमत आहे ती कळेल’ असेही त्यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत योगदान देतानाच नाना पाटेकर यांनी कायमच सामाजिक भान जपले. ‘नाम फाऊंडेशन’, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य करण्यासाठीचे उपक्रम, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प तसेच विविध सामाजिक उपक्रमात भाग घेणे या सर्वातच ते कायमच अग्रेसर राहिले. नाना पाटेकर यांनी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीपासून आपल्या कलाक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे विविध नाटकांतून, चित्रपटातून त्यांनी आपली छाप पाडली. रसिकांनी माझा केलेला गौरव हाच माझ्यासाठी मोलाचा आहे त्यापेक्षा अजून काही गौरव असून शकत नाही. अशीच नाना पाटेकर यांची भावना होती.
