scorecardresearch

VIDEO: काँग्रेसमध्ये तुमच्याविरोधात नाराजी आहे का? प्रदेशाध्यक्षपद जाणार का? नाना पटोले म्हणाले…

काँग्रेसमधील गटबाजीनंतर थेट दिल्लीतून पक्षांतर्गत फेरबदलाच्या हालचाली होत असल्याची चर्चा आहे. तसेच पटोलेंचं प्रदेशाध्यपदही जाणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

Nana Patole Balasaheb Thorat 2
नाना पटोले व बाळासाहेब थोरात (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं दिसलं. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांकडून पक्षांतर्गत गटबाजीचीही चर्चा रंगली. आता या गटबाजीनंतर थेट दिल्लीतून पक्षांतर्गत फेरबदलाच्या हालचाली होत असल्याची चर्चा आहे. तसेच पटोलेंचं प्रदेशाध्यपदही जाणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी शुक्रवारी (१० मार्च) आपली भूमिका स्पष्ट केली.

पत्रकारांनी नाना पटोले यांना विचारलं, ठकाँग्रेसमध्ये गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यानंतर दिल्लीतून मोठे फेरबदल केले जाणार आहेत अशी चर्चा आहे. त्यात तुमच्याही नावाचा समावेश असून प्रदेशाध्यक्षपद जाणार असं बोललं जात आहे. तुमची प्रतिक्रिया काय?”

“काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदल होणारच आहेत”

या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, “काँग्रेसमध्ये कोणताही गोंधळ झाला नव्हता. गोंधळ निर्माण करण्याचं काम करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदल होणारच आहेत. जे काही फेरबदल होतील ते सर्वांना मान्य करावे लागतील.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : विश्लेषण : रश्मी शुक्ला यांच्या नव्या नियुक्तीचा अर्थ काय? फोन टॅपिंगप्रकरणी आरोप असताना बढती कशी मिळाली?

“काँग्रेस पक्षात माझ्याविषयी नाराजी नाही”

तुमच्याविरोधात काँग्रेस पक्षात बरीच नाराजी आहे अशी चर्चा आहे. यावर नाना पटोले म्हणाले, “काँग्रेस पक्षात माझ्याविषयी नाराजी आहे ही केवळ माध्यमांमध्ये चर्चा आहे, पक्षात तसं काही नाही.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 15:49 IST