नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे वाटत नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. भाजपा हा पक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पक्ष ठरेल. मात्र भाजपाला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर मोदी तुम्हाला राजकीय गुरु मानतात का? या प्रश्नावर शरद पवार म्हटले की मोदी कोणाचा सल्ला घेत नाहीत. ते कायम आपली 56 इंच छाती दाखवत असतात असंही पवार म्हटले आहेत.

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर लहान उद्योजकांचं कंबरडं मोडलं आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या निर्णयाची किंमत भाजपाला मोजावी लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर भाजपाची ज्या राज्यांमध्ये 10 वर्षे सत्ता होती अशा ठिकाणीही भाजपाची सत्ता आता नाही. देशातली अशीच स्थिती निर्माण होईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येवून काम करत आहोत. आम्हाला शेकाप मदत करत आहे.जोगेंद्र कवाडेही आम्हाला सहकार्य करत आहेत. हे सर्व एकत्रित काम करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबत सकारात्मक आमची चर्चा झाली आहे.
काँग्रेसची चर्चा झाल्यानंतर आमची एकत्रित चर्चा होईल असेही शरद पवार यांनी सांगितले.

 

14 तारखेला चंद्राबाबू नायडू आणि इतर पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक आहे.त्यात देशस्तरावर कसे लढायचे याबाबतचा अजेंडा एकच असावा असा आमचा प्रयत्न असणार आहे असेही सांगितले.