‘जेट’चे अध्यक्ष नरेश गोयल राजीनाम्यास तयार

गोयल यांनी २५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या जेट एअरवेजमध्ये आखातातील एतिहाद एअरवेजचे २४ टक्के समभाग आहेत

नरेश गोयल

मुंबई : आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याच्या योजनेंतर्गत ऋणकोंनी जेट एअरवेजचे समभाग मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्याची तयारी केल्यानंतर, संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी पायउतार होण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती एका सूत्राने गुरुवारी दिली.

या संदर्भात जेट एअरवेजच्या कंपनी व्यवहार आणि जनसंपर्क विभागाच्या उपाध्यक्ष रागिणी चोप्रा यांनी आपल्याला या घडामोडींची कल्पना नसल्याचे सांगितले.

या कंपनीचे दोन प्रवर्तक, तसेच ऋणको आणि एतिहाद एअरवेज यांच्यातील निरनिराळे प्रश्न सोडवण्यासाठी ऋणकोंची नरेश गोयल आणि एतिहादचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी डग्लस यांच्यासोबत तातडीची बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घडामोड झाली आहे.गोयल यांनी २५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या जेट एअरवेजमध्ये आखातातील एतिहाद एअरवेजचे २४ टक्के समभाग आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Naresh goyal ready to steps down as chairman of jet airways