मुंबई : एका महत्त्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेला ‘सुमी’ चित्रपट ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. ‘६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२’मध्ये या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटा’चा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर हेही ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

हेही वाचा >>> खुशखबर! इंटरनेटशिवाय OTT वरील शो पाहता येणार; सरकार आणतय नवं तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर माहिती

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
kangana ranaut career movies
१६ व्या वर्षी घर सोडणारी ‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…

एकीकडे हिंदीतील सुपरहिट चित्रपट ओटीटी माध्यम गाजवत असताना मराठी चित्रपटही मोठ्या पडद्यावर आणि ओटीटी मध्यामांवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अक्षय बर्दापूरकर आणि ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत हर्षल कामत एन्टरटेनमेन्ट व गोल्डन माउस प्रोडक्शन यांनी ‘सुमी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, ‘सुमी सारखा विलक्षण, प्रायोगिक कथा असलेला चित्रपट वैश्विक स्तरावर प्रेक्षकांना जोडून घेणारा आहे. प्रेक्षकांना वेगवेगळे आशय देऊन मनोरंजन करणे आमचे कर्तव्य आहे. ‘सुमी’ची ही गोड कहाणी सर्वांनाच आवडेल.’ 

हेही वाचा >>> ३० हजार कोटीचं साम्राज्य आणि मुंबईचं एकमेव सरकार; ‘धारावी बँक’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगाराच्या मुलीची ही गोष्ट आहे. अजुनही बऱ्याच ठिकाणी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. मात्र, त्याला अपवाद ठरवत सुमी कसे शिक्षण घेते याची ही कथा दिग्दर्शक अमोल गोळे यांनी मांडली आहे. चित्रपटात स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका आहे. अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणे गायले असून संगीतकार रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाची मूळ कथा – पटकथा संजीव झा यांची आहे. प्रसाद नामजोशी यांनी या चित्रपटाचे संवाद आणि गीत प्रसाद नामजोशी यांचे आहेत.