मुंबई : प्रसिध्द वेशभूषाकार नचिकेत बर्वे यांना ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी, ३० सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. बर्वे यांनी २००७ साली स्वत:चे ‘फॅशन लेबल’ सुरू केले. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अनुष्का शर्मा, क्रिती सनन आदी नामवंत कलाकार त्यांच्या ‘कलेक्शन’चे ग्राहक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटांसाठी त्यांना राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा त्यांनी वेशभूषा केलेला पहिलाच हिंदी चित्रपट आहे. आगामी ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटासाठीही त्यांनी वेशभूषा केली आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National film award costume designer nachiket barve president ceremony delhi today ysh
First published on: 30-09-2022 at 01:25 IST