धक्कादायक! पॉर्नच्या आहारी गेलेल्या १४ वर्षाच्या मुलाने १६ वर्षाच्या बहिणीवर केला बलात्कार

पॉर्न पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका १४ वर्षाच्या मुलाने आपल्या १६ वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे.

पॉर्न पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका १४ वर्षाच्या मुलाने आपल्या १६ वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. अनेक महिने हा मुलगा आपल्या बहिणीवर अत्याचार करत होता. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे कुटुंबियांना समजल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. कामोठे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली असून त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे असे डीसीपी तृषार दोषी यांनी सांगितले. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार मुलीच्या आईने हा गुन्हा समोर आणला व भावाला अटक करायला लावली. आरोपीला पॉर्न पाहण्याची सवय जडली होती. चार महिन्यांपूर्वी या मुलांचे आई-वडिल काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी कोणी नव्हते. मुलाने तीच संधी साधून आपल्या मोठया बहिणीवर बलात्कार केला. त्यानंतर सतत आरोपी संधी मिळेल तेव्हा बहिणीवर अत्याचार करत होता.

अलीकडे या मुलीला आरोग्यसंदर्भात काही समस्या सुरु झाल्या होत्या. या मुलीची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली होती. डॉक्टरांनी तिच्या वेगवेगळया तपासण्या केल्या त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे समजले. कुटुंबियांना हे समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला. या मुलीचे समुपदेश केल्यानंतर तिने सर्व घडला प्रकार सांगितला.

कामोठे पोलिसांनी एफआयआर नोंदवून सात जूनला आरोपीला अटक केली. पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही नात्याने भाऊ-बहिण असून कामोठे गावातील शाळेमध्ये जातात. दोघांचे आई-वडिल नोकरी करतात त्यामुळे कामानिमित्ताने ते बराचवेळ घराबाहेर असतात. आरोपी मुलाला पॉर्न पाहण्याची सवय लागली होती. घरात कोणी नसतात तो सतत पॉर्न पाहत बसायचा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Navi mumbai brother rape sister