scorecardresearch

हनुमान चालिसा प्रकरण : राणा दाम्पत्याचा दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. असे करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हनुमान चालिसा प्रकरण : राणा दाम्पत्याचा दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश
हनुमान चालिसा पठण प्रकरण : राणा दाम्पत्याचा दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश ( संग्रहित छायाचित्र )

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या वाद प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती, आमदार रवी राणा यांनी मंगळवारी विशेष न्यायालयात अर्जाद्वारे केली. न्यायालयाने त्यांच्या अर्जावर पोलिसांना २ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. असे करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा… मुंबईमधील सैफी रुग्णालयातील अप्रमाणित इंजेक्शन प्रकरण : औषध विक्रेत्यांचे परवाने स्थगित करणार

याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी दोघांतर्फे प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना राणा दाम्पत्याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा… आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करावा – आमदार योगेश सागर

दरम्यान, खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे वारंवार आदेश देऊनही राणा दाम्पत्य सुनावणीला अनुपस्थित न राहिल्याने विशेष न्यायालयाने तिसऱ्यांदा दोघांच्या नावे जामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य न्यायालयात उपस्थित झाले. त्यानंतर न्यायालयाने वॉरंट रद्द केले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 13:29 IST

संबंधित बातम्या