मुंबई : खार पोलीस ठाण्यानंतर खासदार नवनीत राणा यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यातही वाईट वागणूक मिळाली नाही, असा आरोप करण्यात आला होता. हा आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळला आहे. राणा यांना पाणी देण्यात आले होते, तसेच शौचालयात जाण्यासाठी कोणतीही अडवणूक करण्यात आली नसून याबाबतचे पुरावे म्हणून दोन छायाचित्रे पोलिसांकडे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीत केवळ खार पोलीस ठाण्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे पोलीस आयुक्त संजय राऊत यांनी केवळ खार पोलीस ठाण्यामधील चहा पितानाचे राणा दाम्पत्याचे चित्रीकरण ट्विटरवर प्रसारित केले होते. याशिवाय राणा यांना न्यायालयासमोर हजर केले असता तेथेही पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे राणा दाम्पत्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. पण त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पोलिसांनी वाईट वागणूक दिल्याची तक्रार केली होती.