अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी असल्याचं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे. आज आपण मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणारच असा निर्धार यावेळी राणा दांपत्याने खार येथील घरातील देवघरात पूजा करताना व्हिडीओ प्रसारमाध्यमांसाठी शेअर करताना म्हटलंय. तसेच आमच्याविरोधात आंदोलन करणारे शिवसैनिक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे नाहीत असा टोलाही रवी राणा यांनी लगावलाय.

नक्की वाचा >> “मुझको राणाजी माफ करना असं नवनीत राणा रवी राणांना बोलणार आहेत, कारण…”

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी खारमधील घरातील देवघरात पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. “या ठिकाणी पवनपुत्र हनुमान आणि श्री रामचंद्रांचा आशिर्वाद घेऊन, भगवंताचा आशिर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, शांततेसाठी (प्रार्थना केली.) ज्या पद्धतीने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी आहे (ते पाहता) मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला शनी लागलेला आहे,” असं रवी राणा या व्हिडीओत म्हणालेत.

नक्की वाचा >> Rana vs Shivsena : शिवसैनिकांना वेगळीच शंका, राणांच्या घाराबाहेर गाड्यांच्या डिक्क्यांची तपासणी; ‘मातोश्री’बाहेर दुसऱ्या दिवशीही गर्दी

तसेच पुढे बोलताना, “मातोश्री हे आमचं हृदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्या ठिकाणी जाऊन आज आम्ही हनुमानचालीसा वाचणार आहोत. शनिवारचा दिवस हा बजरंगबलीचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या शांतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून राज्याला जो शनी लागलाय तो आम्हाला या ठिकाणी संपवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुख, शांत असावी. महाराष्ट्राची उन्नती झाली पाहिजे या उद्देशाने हनुमान चालीसा वाचवण्यासाठी जर आम्हाला इतका विरोध केला जातोय. मराठी माणसाला हनुमान चालीसा वाचण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करुन करतायत,” असंही रवी राणा म्हणालेत.

नक्की वाचा >> मुंबईत घडामोडींना वेग! मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याबरोबरच पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाची पोलीस सुरक्षा वाढवली

“या ठिकाणी असणारे शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असते तर आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली असती. महाराष्ट्राला लागलेला शनी संपवण्यासाठी आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं. या ठिकाणी पोलीस आम्हाला थांबवत आहेत. शिवसैनिकांना दरवाजापर्यंत उभं करुन आमच्या विरोधात कट रचला जातोय,” असं रवी राणा म्हणालेत.