मुंबईच्या समुद्रात बुडणाऱ्या एका जहाजावरील २० जणांची भारतीय नौदलाने सुटका केल्याच्या घेटनेनंतर आज दमण किनाऱ्यावरही अशीच थरारक कामगिरी नौदलाने केली आहे. दमनच्या किनाऱ्यापासून २४ नॉटिकल मैल अंतरावर, समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजातून १४ जणांची नौदलाच्या जवानांनी सुटका केली आहे. ‘एमव्ही कोस्टर पाईड’ हे व्यापारी जहाज समुद्रात बुडत असताना नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी, ‘सी किंग’ आणि ‘चेतक’ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हे बचावकार्य पार पाडलं. जहाजावरील सर्व १४ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, हे जहाज कशामुळे बुडत होतं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
दोन दिवसापूर्वी मुंबईजवळ बुडणाऱ्या ‘जिंदल कामाक्षी’ या खाजगी जहाजात अडकलेल्या २० प्रवाशांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं.